अहील्यानगर दि.१४ प्रतिनिधी
मुळा लाभक्षेत्रातील शेतकर्याची पाण्याची मागणी लक्षात घेवून रब्बी हंगामासाठी १७फेब्रुवारी २०२५ पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभगाच्या अधिकार्याना दिल्या आहेत.
यापुर्वी मुळा उजवा कालव्याचे रब्बी आवर्तन ठरलेल्या नियोजना प्रमाणे पूर्ण झाले आहे.उन्हाळी आवर्तन १ मार्च पासून करण्याचे नियोजन होते.परंतू लाभक्षेत्रात पाण्याची पातळी खूपच खालावल्याने शेतकर्याची पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होती.
यासंदर्भात आ.मोनिका राजळे आणि आ.विठ्ठलराव लंघे यांनीही जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची भेट घेवून रब्बी पिकांची तसेच पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेवून आवर्तन सोडण्याची विनंती केली होती.
मंत्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचे गांभिर्य लक्षात घेवून १७ फेब्रुवारी २०२५ पासूनच आवर्तन सुरू करण्याच्या सूचना त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याने लाभक्षेत्रातील लोकांना मोठा दिलसा मिळणार आहे.