बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेचा श्रीगोंद्यात निषेध
श्रीगोंदा दि.23 ऑगस्ट 2024
बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेतील नराधमांवर कडक कारवाई करण्याची मागणी श्रीगोंदा येथील भाजपा जिल्हा सचिव संगीता घोडेकर, तालुका अध्यक्षा देवयानी शिंदे, शहरध्यक्षा सुजाता खेडकर, उपाध्यक्षा सुजाता उकांडे, उषाताई कर्डिले यांनी गुरूवारी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन देऊन केली.
यावेळी सौ.संगीता घोडेकर म्हणाले की,राज्यात वाढत्या आत्याचाऱ्याच्या घटनेला आळा बसला पाहिजे , अशा घटनेमुळे आजही महिला-मुली सुरक्षित आहेत का नाही असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे या नराधमांला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी त्यांनी निवेदनाद्वारे केली . यावेळी त्यांच्या समवेत पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.