सकल मराठा समाजाच्यावतीने तालुका बंद ठेवत काष्टी येथे रास्ता रोको…
[videopress aC4JnUvm]
काष्टी दि. 31 ऑक्टोबर 2023
श्रीगोंदा: मराठा समाजास सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यास सकल मराठा समाज श्रीगोंद्याच्या वतीने पाठिंबा देत आज श्रीगोंदा शहरासह अनेक गावात बंद ठेवण्यात आला. यावेळी काष्टी येथील चौकात सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन करीत शासनाचा निषेध केला. यावेळी सर्वपक्षीय नेते व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.