बनपिंपरी येथे अनोखा श्रावणी पोळा साजरा
श्रीगोंदा दि 4 सप्टेंबर 2024
श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी येथे श्रावणी पोळा सना निमित्त संपूर्ण गाव एकत्र येऊन आगळा वेगळा सण साजरा केला जि. प. सदस्य मा. सचिनभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्वं युवक, ग्रामस्थ सर्वांनी पुढाकार घेऊन एक आगळा वेगळा पोळा साजरा केला.
त्या निमित्ताने सर्वं बैलांची मिरवणूक वाजत गाजत होऊन मानाच्या बैलजोडीस प्रोत्सहान पर बक्षीस वितरण जि. प. सदस्य सचिनभाऊ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले गावात पाहुणे म्हणून आलेल्या पुणे बालेवाडी येथील मा.चेतन शेठ बालवडकर यांच्या बैलजोडीस प्रथम क्रमांक मिळाला,द्वितीय क्रमांक बनपिंपरी येथील शेतकरी भाऊसाहेब जगताप यांना मिळाला, तृतीय बक्षीस बनपिंपरी येथील शेतकरी बबन गोविंद पठारे व चतुर्थ बक्षीस नानासाहेब सुदाम पठारे यांना मिळाले.
मानाच्या जोडीचा मान अहमदनगर जिल्ह्याचे भूषण मा. आमदार अरुणकाका जगताप यांच्या जोडीस मिळाला. एक अनोखा सण बनपिंपरी येथे सचिनभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गावचे लोकनियुक्त सरपंच गौतम पठारे, मार्केट कमिटीचे संचालक बाबासाहेब जगताप, मा संचालक नितीन पठारे, ग्रामपंचायत सदस्य रवीराज पठारे, श्रीगोंदा येथील कृषि अधिकारी संदिप बोदगे साहेब, व सर्वं ग्रामस्थ यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य केले तरी या बैलपोळ्यासाठी पुढील वर्षी सर्वं महाराष्ट्रातील शेतकरी व बैलशोकीनानी भाग घेण्याचे आव्हान मा.सचिनभाऊ जगताप यांनी केले आहे महाराष्ट्राची शान खिलार गोवंश जतन करण्यासाठी प्रोहात्सन मिळावे म्हणून पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.