संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा अन् रखडलेले रस्त्याचे काम पुन्हा सुरू…
श्रीगोंदा दि.22 नोव्हेंबर 2023
महांडुळवाडी ते खाकीबाबा या श्रीगोंद्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम गेले वर्षभरापासून बंद पडलेले होते.संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते.रस्त्याचे अपूर्ण काम संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केले होते, याबाबत संबंधित ठेकेदाराचा कामाचा परवाना रद्द करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती.बांधकाम विभागाचे अधिकारी श्री.डोंगरे साहेब,श्री. वराळे साहेब यांनी संबंधित रस्त्याचे काम हे दुसऱ्या ठेकेदारास देऊन उत्तम प्रतीचे काम पुन्हा सुरू केले आहे.हे काम करणारे ठेकेदार श्री.भापकर यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने रस्त्याचे काम व्यवस्थित व दर्जेदार करण्याची विनंती केली.
तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम गेले अनेक महिने बंद पडले होते या कामाचा पाठपुरावा सतत संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला होता. संभाजी ब्रिगेडच्या त्या पाठपुराव्याला यश आले असून खराब रस्त्यामुळे नागरिकांचे होणारे हाल आता बंद होणार आहेत यामुळे परिसरातील नागरिकांनी संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत, व काम सुरू झाल्यामुळे नागरिकांमधून आनंद व्यक्त होत असल्याची माहिती नगरीपंचशी बोलताना संभाजी ब्रिगेड,शेतकरी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी दिली. .