Monday, December 23, 2024

जबरी चोरी करून 7 महिने फरार असणार आरोपी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद

कोतवाली पोलिसांनी मोठ्या शिताफिने आरोपीस केले अटक,तीन दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर दि.2 डिसेंबर 2023

दि.१९/०४/२०२३ रोजी फिर्यादी सत्यजित मारुती वाघ वय ४९ वर्ष धंदा व्यवसाय रा. सौरभ कॉलनी, बुरुडगावरोड अहमदनगर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, दिनांक १९.०४.२०२३ रोजी सांयकाळी ०७.०० वा ते ०७.३० वा चे दरम्यान स्टेशन रोड अहमदनगर यथे माझे वडापावचे दुकानात ठेवलेली कापडी पैशाची पिशवी त्यामध्ये असलेले १०,०००/- रु रोख रक्कम अंदाजे ही इसम नामे जावेद शेख रा. मुकुंदनगर, अहमदनगर याने बळजबरीने हाताला हिसका देवुन चोरी करुन घेवुन गेला त्यावरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ३८५/२०२३ भादवि कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा घडले पासुन आरोपी जावेद शेख हा फरार झालेला होता. गुन्हयाचा तपास करत असतांना कोतवाली पोलीसांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, जावेद शेख हा त्याचे राहते घरी येणार आहे. त्यावरून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भांसी व इतर पोलीस अंमलदारांनी त्याचे घराच्या भोवती सापळा लावुन त्यास शिताफिने ताब्यात घेतले.

जावेद ताज मोहम्मेद शेख, वय ३१ वर्ष रा.न्यु हिना पार्क, ७७२, दर्गादायरा रोड, मुकुंदनगर, अहमदनगर यास अटक केले असून कोर्टा समक्ष हजर केले असता त्यास ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीस विश्वासात घेवुन चौकशी करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. गुन्हयाचा अधिक तपास सपोनि विश्वास भांसी हे करत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे,
यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सपोनि विश्वास भांसी पोलीस जवान योगेश खामकर इस्त्राईल पठाण योगेश भिंगरदिवे तनवीर शेख ए पी इनामदार सलीम शेख सुजय हिवाळे केलास शिरसाठ सोमनाथ राऊत आदींच्या पथकाने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या