ताज्या बातम्याखा.विखे-आ.शिंदे यांची मोठी खेळी ! 'त्या' सर्वांना भाजपात आणले, लंके, पवारांवर टोलेबाजी

खा.विखे-आ.शिंदे यांची मोठी खेळी ! ‘त्या’ सर्वांना भाजपात आणले, लंके, पवारांवर टोलेबाजी

spot_img
spot_img

 

अहमदनगर लोकसभेत सुरवातीला नाराज असणारे आ. राम शिंदे हे खा. सुजय विखे यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. त्यामुळे खा. सुजय विखे यांची ताकद देखील वाढली आहे.

आता त्यांनी एकत्रित येत मोठी राजकीय खेळी केली आहे. खर्डा गण बूथ सक्षमीकरण अभियानांतर्गत खर्डा येथ एक कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी तब्बल १०० युवकांचा भाजपत प्रवेश करून घेतला.

विविध क्षेत्रात नावलौकिक व कार्यक्षेत्र असणारे हे तरुण ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात आल्याने खा. विखे यांची ताकद वाढली आहे.

यावेळी खा. सुजय विखे यांनी तुडं टोलेबाजी केली. ते म्हणाले, नीलेश लंके नगर दक्षिणेचा विकास करणार म्हणतात. मात्र, निधी आणायला सरकार स्वपक्षाचे लागते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे केवळ १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

त्यातीत पाच जणांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. उर्वरित पाच जणांमध्ये कोण निवडून येईल ही शंका असल्याची टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर आयोजित सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे महायुती अधिक बळकट होणार आहे, तसेच आमदार रोहित पवार यांनाही लक्ष्य केले.

२०१९ मध्ये कर्जत-जामखेडच्या लोकांना वेगवेगळी विकासाची स्वप्ने दाखवली गेली. बारामतीसारखा विकास करू म्हणून केवळ बारामती दर्शन घडवले. परंतु गेल्या साडेचार वर्षांत कसलाही विकास त्यांना करता आला नाही, अशी टीका विखे पाटील यांनी केली.

 

आ. रोहित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न, पण त्यांना..

 

यावेळी आ. राम शिंदे म्हणाले, रोहित पवार मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, त्यांना ग्रामपंचायतीचे कायदे नियम माहिती नाहीत. खर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंचावर अविश्वास ठराव आणण्यासाठी कायद्याचा अभ्यास न करता सदस्यांना पळवून नेले.

कायद्यात अविश्वासाची तरतूद नसल्यामुळे पळवून नेलेले सदस्य पुन्हा बारामतीहून खर्ड्याला आणून सोडावे लागले. राज्यात महायुती सरकार येण्यापूर्वी दोन वर्षांच्या कालावधीमध्ये पवार यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना फक्त त्रास देण्याचे काम केले असल्याची टीका शिंदे यांनी केली.

 

आ. राम शिंदे यांची ताकद

कर्जत जामखेड येथे आ. राम शिंदे यांची मोठी राजकीय ताकद आहे. ही राजकीय ताकद आता खा. सुजय विखे यांच्या सोबत उभी असल्याने त्यांना याचा राजकीय फायदा होईल.

सुरवातीच्या काळात निलेश लंके यांच्या सोबत वाटणारे आ. शिंदे हे आता विखे यांना सोबत करत असल्याने लंके काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लेटेस्ट न्यूज़