वृक्षारोपण करून मुलीच्या जन्माचे केले स्वागत…
श्रीगोंदा दि.15 डिसेंबर 2024
मुलींचा जन्मदर घटत असताना पत्रकार गणेश आणि त्यांच्या पत्नी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापिका सौ.स्वाती यांना पहिलेच कन्यारत्न झाल्यावर मुलीच्या जन्माचे स्वागत वृक्षारोपण करून समाजापुढे आदर्श उभा केल्याचे गौरवोद्गार नवनिर्वाचीत आमदार विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषद मुलींच्या प्राथमिक शाळेत वृक्ष रोपण प्रसंगी बोलताना काढले.
पत्रकार गणेश व सौ. स्वाती कविटकर यांना ३ महिन्यापूर्वी कन्या रत्न झाले. रविवारी कन्या शार्वी हीचे श्रीगोंदा येथे आगमन झाले. आगमन वेळी देखील बँड पथकाद्वारे स्वागत करण्यात आले. तर शुक्रवारी शहरातील जिल्हा परिषदेच्या मुले, मुली आणि ऊर्दू शाळेच्या आवारात आमदार विक्रम पाचपुते,गट विकास अधिकारी राणी फराटे,मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा मीरा शिंदे,भाजप नेते माजी नगरसेवक दत्ता हिरणवाळे, रामदास ननावरे, प्रकाश बोरुडे,सिनलकर शोभा, रनसिंग अश्विनी, शिंदे माधुरी, शिंदे सोनाली, वाळके ताई,शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी आमदार पाचपुते बोलत होते.
मुलींच्या शाळेत वृक्ष लावल्याने येथील चिमुकल्या विद्यार्थिनी देखील याची निगा राखतील तसेच या कार्यक्रम निमित्ताने शाळा इमारत विषय आला पण शाळा व्यवस्थापन समिती उशिरा आपणाकडे आल्याने संपूर्ण इमारत साठी निधी मिळवता आला नाही पण ५ लाख रुपयांची तरतूद केली होती. शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत १००० पट संख्या असणाऱ्या या शाळेसाठी मंत्रिमंडळ झाल्यावर पालकमंत्री यांच्या मदतीने तसेच शासन स्तरावर पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देत आपण नेहमीच सकारात्मक विचार करून काम करत असल्याने शाळेच्या मुले, मुली आणि ऊर्दू शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावू आणि हा प्रश्न देखील शार्वी च्या निमित्ताने पुढे आला ही भाग्याची बाब आहे.
गणेश व सौ. प्रा.स्वाती कविटकर यांनी बोलताना वृक्ष रोपण करण्याची प्रेरणा ह.भ. प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी मिळालेले असून मुलगा मुलगी एकसमान ही संकल्पना रुजावी यासाठी शाळेत वृक्ष रोपण करत आहोत. मुलींनी, मुलांनी या झाडांचे संगोपन करावे असे आवाहन कविटकर दांपत्यांनी केले. यावेळी तिन्ही शाळेच्या वतीने नूतन आमदार विक्रम पाचपुते आणि कविटकर दांपत्याचा सत्कार करण्यात आला.
चौकट
नूतन आमदार विक्रम पाचपुते म्हणाले शहरातील जिल्हा परिषद शाळेचा १००० पट ही अभिमानाची आणि येथील शिक्षकांच्या मेहनतीचे निदर्शक आहे शहरात जिल्हा परिषद शाळा ,आणि विद्यार्थी संख्या एवढी? इमारतीसाठी निधी कोणत्या योजनेत आणायचा हे अनाकलनीय असेल पण श्रीगोंदा तालुकाच अनाकलनीय आहे हा तालुका सगळ्यांना समजला असता तर राजकीय चित्र खूप वेगळे असते ते इतरांना समजत नाही तेच बरे असे म्हणताच हशा पिकला!