आ.रोहीत पवारांनी स्वतः ट्विट करून दिली माहिती
कर्जत दि .22 डिसेंबर 2023
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले. रोहित पवारांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. रोहित पवारांचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्या ठिकाणी प्रोफाइल फोटोला सिया राजपूत नाव दिसून आले.
आपले फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती रोहित पवार यांनी ट्विटर अकाउंटवरून दिली. गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मीडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरू आहेत. आज माझं अधिकृत फेसबुक पेज हॅक झालं…या पेजवर चुकीचा मजकूर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावं, याबाबत रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती रोहित पवारांनी दिली.
रोहित पवार हे सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतात. काही दिवसांपासून त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याचे प्रकार सुरू असल्याने त्यांनी ट्विटमधून संताप व्यक्त केला आहे. तसेच फेसबुक पेज रिकव्हरीचे प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. रोहित पवारांचे ट्विटरसह फेसबुकवर लाखोंच्या संख्येत फॉलोअर्स आहेत. फेसबुक पेजवर त्यांचे 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.