ताज्या बातम्याजलजीवन मिशन संदर्भातील सामाजिक कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण अखेर मागे

जलजीवन मिशन संदर्भातील सामाजिक कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण अखेर मागे

spot_img
spot_img

जल जीवन मिशन संदर्भातील सामाजिक कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण अखेर मागे

श्रीगोंदा दि.27 जून 2024

श्रीगोंदा तालुक्यातील ७९ गावांसाठी केंद्र सरकारची हर घर जल अंतर्गत जल जीवन मिशन पाणी योजना मंजूर आहे. यापैकी फक्त १३ गावांची पाणी योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु इतर गावांची योजना का रखडली ? इतर गावातील महिला व नागरिकांना या योजनेपासून अधिकारी व ठेकेदारांनी मनमानी करत दिलेल्या वेळेत पाणी योजना पूर्ण न केल्याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी जगताप व श्रीरंग साळवे हे पंचायत समिती श्रीगोंदा येथे कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले होते.

 

पाणी योजनेचा कार्यारंभ आदेशातील अटी शर्तीनुसार विहीत वेळेत पुर्ण होणे बंधनकारक असताना संबंधीत अधिका-यांनी ठेकेदारांना पाठीशी घालत पाण्यापासून गावातील नागरिकांना वंचित ठेवल्यामुळे असे अधिकारी यांना निलंबीत करावे. विलंब करणारे ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करत त्यांचा ठेका रद्द करावा. गावांना वेळेत हक्काचे पाणी मिळावे. अशा अनेक मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण करण्यात आले होते.

गट विकास अधिकारी राणी फराटे यांनी मध्यस्थी करत संपुर्ण पाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येतील. चांभुर्डी गावातील पाणी योजना ४५ दिवसात पुर्ण करण्यात येईल. तसेच कामे पुर्ण करण्यासाठी येणा-या गाव पातळीवरील अडचणी लेखी स्वरुपात देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. गट विकास अधिकारी राणी फराटे यांनी वरील आशयाचे पत्र देऊन व पाणी देऊन आज उपोषण मागे घेण्यात आले.

लेटेस्ट न्यूज़