ताज्या बातम्यापालखी मार्गासाठी सव्वादोन कोटीहून अधिक निधी : पालकमंत्री विखे

पालखी मार्गासाठी सव्वादोन कोटीहून अधिक निधी : पालकमंत्री विखे

spot_img
spot_img

पालखी मार्गाची काम वेळेत पूर्ण करा , विखे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

संगमनेर : दि.13 जून 2024

 

श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज पालखी मार्गाचे काम आषाढी वारीपूर्वी निर्धारित वेळेत पूर्ण करा. हे काम करताना कामाची गुणवत्ता राखा, वारकऱ्यांसाठी तयार होत असल्याने या मार्गाच्या कामाबाबत अधिकाऱ्यांनीही अधिक सजग राहून हे काम पूर्ण करून घेण्याच्या सूचना महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या आहेत.

 

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज पायी पालखी सोहळा हा संगमनेर तालुक्यातून मार्गस्थ होत असतो. सिन्नर हद्द ते पारेगाव बुद्रुक या मार्गाचे काम रखडले होते. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर या रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव

 

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला प्रशासकीय तसेच तांत्रिक मान्यताही मिळाल्यानंतर पालकमंत्री विखे-पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे २ कोटी ३० लाख ८७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

 

संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर येथून २० जून रोजी मार्गस्थ होणार आहे. २७ जून रोजी परंपरेप्रमाणे तालुक्यातील पारेगाव येथे या पालखीचा मुक्काम असणार आहे. या पार्श्वभूमीवर या पालखी मार्गाच्या सुरू असलेल्या कामाची माहिती मंत्री विखे-पाटील यांनी जाणून घेतली. तसेच या मार्गाच्या कामाबाबत प्रांताधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

 

अधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी

 

■ मंगळवारी (दि. ११) प्रांताधिकारी शैलेश हिंगे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली.

■ या मार्गाचे काम अधिक दर्जेदार आणि गुणवत्तेने पूर्ण करावे. महायुती सरकारने या मार्गाला मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.

■ एका आध्यात्मिक कार्यासाठी हा मार्ग होणार असल्याने या कामाचे वेगळेपणही दाखवून द्या, अशा सूचनाही मंत्री विखे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

लेटेस्ट न्यूज़