ताज्या बातम्याडॉ.सुजय विखेंच्या 'त्या' वक्तव्याची सर्वत्र चर्चा..!

डॉ.सुजय विखेंच्या ‘त्या’ वक्तव्याची सर्वत्र चर्चा..!

spot_img
spot_img

टायगर अभी जिंदा है!!

अहिल्यानगर .दि.10 ऑक्टोबर 2024

नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैन येथील कार्यक्रमात बोलताना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी खासदार निलेश लंकेवर जोरदार टीका केली आहे. मी कुठे गेलेलो नाही संपलेलो नाही टायगर अभि जिंदा है. अशे अनेक वादळ येत असतात मात्र निवडून आलेल्या माणसाच्या भाषणा मध्ये कधीच समाज हिताच काम नाही, शेतकऱ्यांच्या हिताच काम नाही, परिवर्तन व्हावं असं कधीच ऐकायला मिळत नाही फक्त हा बोगस,याला गाडू, तो हरामखोर फक्त एवढंच. तुम्ही कसं मतदान टाकता आज जी गर्दी आहे त्यातल्या निम्म्या लोकांनी माझा कार्यक्रम लावला.तरी देखील मी तुमच्या मध्ये आलोय.पण कार्यक्रम माझा नाही तर तुमच्या पिढीचा कार्यक्रम तुम्ही लावला माझ्या पडण्याने नुकसान तुमच्या लोकांचा झाला आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त करत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे. खासदार विखे हे नगर तालुक्यातील पिपंळगाव उज्जैन येथील कार्यक्रमात बोलत होते…

लेटेस्ट न्यूज़