ताज्या बातम्यापतीच्या स्मरणार्थ पत्नीने केले वृक्षारोपण....

पतीच्या स्मरणार्थ पत्नीने केले वृक्षारोपण….

spot_img
spot_img

पतीच्या स्मरणार्थ पत्नीने केले वृक्षारोपण करून पर्यावरणाला हातभार 

श्रीगोंदा दि.10 जानेवारी 2025

 

सुरोडी गावच्या सरपंच श्रीमती मीनाक्षी रामदास सकट यांच्या पतीचे 11-12-2024 रोजी निधन झाले . त्यांच्या पहिल्या महिन्याच्या दिवशी कै.वासी रामदास सकट यांच्या स्मरणार्थ सुरोडी गावातील स्मशानभूमी येथे वृक्ष लागवड करून सर्व सरपंच सकट यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. या वृक्षारोपणा वेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

यावेळी सरपंचप श्रीमती मीनाक्षी सकट म्हणल्या की हे झाडे मी फक्त लावलेच नाही तर आयुष्यभर या झाडाची निगा म स्वतः राखणार आहे. व  सर्व झाडे जगवण्याची जबाबदारी माझी आहे . या झाडावरती आणि पक्षी राहण्याचा आनंद घेतील अशी मला खात्री आहे.  या आल्यावर या झाडाकडे पाहून स्वर्गवासी सकट साहेबांची आठवण सगळ्यांनाच होईल असे जड अंतकरणाने भावना व्यक्त केल्या. श्रीमती सकट यांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे सुरडीकर ही भारावून गेले.यावेळी  गावचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेरमान भास्कर वागस्कर म्हणले की येथे कै.वासी रामदास सकट यांच्या स्मरणार्थ वृक्ष रोपण अशी पाटी लाऊ.

यावेळी सुरोडी गावचे माजी उपसरपंच गोवर्धन वागस्कर सतीश दवणे ,भगवान वागस्कर, दास ससाणे दुर्यधन काका, कांदेकर ,राजू ससाणे,संजय भाऊ सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज़