ताज्या बातम्याहे हिंदूंचे सरकार हिंदुंवरचा अन्याय कदापी सहन करणार नाही : राणे

हे हिंदूंचे सरकार हिंदुंवरचा अन्याय कदापी सहन करणार नाही : राणे

spot_img
spot_img

श्रीगोंदा येथे ‘त्या’ कुटुंबीयांची घेतली नितेश राणे यांनी भेट

श्रीगोंदा दि.६ फेब्रुवारी २०२५

श्रीगोंदा येथील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनामार्फत मदतीसाठी तातडीने प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय, बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिले.

काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा येथे फटाके वाजविल्याचा राग मनात धरून काही समाजकंटकांनी दगडफेक केली होती. यामध्ये रामा शंकर ससाणे हे जखमी झाले होते. नंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, मुख्य आरोपी अतिक कुरेशी याला अटक करावी यासाठी दोन दिवसांपासून श्रीगोंदा पोलिस ठाण्यासमोर काही कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले होते.

मंत्री नीतेश राणे, आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रम पाचपुते यांनी बुधवारी (दि. ५) दुपारी.रामा शंकर ससाणे यांच्या कुंटुबीयांसह इतर समाज बांधवांची भेट घेतली. त्यानंतर श्रीगोंदा पोलिस ठाण्यासमोर उपोषणकर्त्यांचीही भेट घेतली.

त्यानंतर राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पोलिस तपास कसा झाला ? त्यामध्ये काही कच्चे दुवे राहिले का ? याबाबत आपण माहिती घेत आहोत.

हिंदूंच्या ताकदीमुळे हे सरकार स्थापन झाले आहे या सरकारच्या काळात कुठल्याही हिंदूंवर कुठल्याही प्रकारचा झालेला अन्याय सहन करणार नाही . हिंदू समाजातील प्रत्येक व्यक्तीला विश्वास आहे सरकार त्यांच्याबरोबर आहे . मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून येथे आलो आहे . येथील जो जीहादी कुरेशी आहे त्याला वाटते हे पाकिस्तान आहे मात्र हे खपवून घेतले जाणार नाही.आता त्याला कळेल की सरकार कोणाचे आहे ? व पोलीस कशाला म्हणतात ? सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून त्याची दहशत मोडून काढण्याचे काम करणार आहोत ज्यामुळे तो परत उठण्याचा प्रयत्न करणार नाही असे मंत्री राणे यांनी आपल्या कडक हिंदुत्ववादी शब्दात कुरेशीचा समाचार घेतला. पुढे बोलताना राणे म्हणाले की ससाने नगर परिसरात दिवाळी- पाडव्याच्या रात्री झालेल्या दगडफेक घटने दरम्यान जखमी झालेल्या व नंतर मयत झालेल्या ससाने कुटुंबाला सांत्वनभेट व सदर घटनेतील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना धीर देण्यासाठी आपण श्रीगोंद्यात आलो आहोत. आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सरकार तुमच्याबरोबर असल्याचा विश्वास राणे यांनी उपोषण कर्त्यांना देऊन आरोपींवर कारवाई केली जाईल असे सांगत उपोषण सोडवले .

सरकारची भूमिका स्पष्ट आहे आम्हाला बांगलादेशीय रोहिंगे मुसलमान मुक्त करायचे आहे असे ते म्हणाले . यावेळी त्यांच्यासमवेत अहिल्यानगर मतदार संघाचे आमदार संग्राम जगताप व श्रीगोंदा मतदार संघाचे विक्रम सिंह पाचपुते व पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते

लेटेस्ट न्यूज़