नगर येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्याला आमदार निलेश लंके यांची हजेरी
नगर दि.24 मार्च 2024
महाविकास आघाडीची (NCP Sharad Pawar Group)अहमदनगर येथील राष्ट्रवादी भवन येथे बैठक सुरु आहे. विशेष म्हणजे या बैठकीला अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके(Nilesh Lanke) हे उपस्थित होते.
या सभेला जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेलचेही पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते. दरम्यान राज्यात बदलत्या समीकरणात जिल्ह्यात होत असलेल्या या बैठकीला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान येणाऱ्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय देखील होण्याची दाट शक्यता आहे. तसेच या बैठकीला मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदधिकारी उपस्थित आहेत.
आमदार निलेश लंके हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र अद्याप त्यांनी आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट केलेली नाही. तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून लंके हे लोकसभा लढवणार अशी चर्चा आहे. मात्र अद्याप लंके यांचा पक्ष प्रवेश झालेला नाही.
यातच गेल्या काही दिवसांमध्ये आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या भेठगाठी घेतल्या आहेत. यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश कधी होणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत आमदार निलेश लंके हे उपस्थित राहिल्याने मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आमदार निलेश लंके हे अहमदनगर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तयारी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र शरद पवार आणि निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दल आणि पक्षप्रवेशाबद्दल कोणतीही घोषणा केली नाही.
निलेश लंके यांनी पवारांची भेट घेतली होती. असं असलं तरी आजपर्यंत आमदार निलेश लंके यांनी आत्तापर्यंत शरद पवार गटात जाण्याबद्दल किंवा लोकसभा उमेदवारीबद्दल कसलीही वाच्यता केली नाही. त्याचं कारणही तसंच आहे.
जर आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला तर त्यांच्यावर अजित पवार गटाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे आत्तापर्यंत आमदार लंके यांनी कसलीही घोषणा केली नाही. त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. असं असलं तरी आता आमदार निलेश लंके हे आपली भूमिका कधी जाहीरपणे स्पष्ट करणार? हे पाहावं लागणार आहे.