मा. सचिन भाऊ जगताप यांच्या हस्ते बाणेर येथील उद्योजकांचा सन्मान
श्रीगोंदा दि.3 नोव्हेंबर 2023
श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी येथील सुप्रसिद्ध भैरवनाथ मंदिरास आज बाणेरचे स्वरा ग्रुप ऑफ हॉटेलचे सुप्रसिद्ध उद्योजक विश्वास मुरकुटे त्याचबरोबर उद्योजक गणेश बोराडे उद्योजक निलेश आंग्रे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सर्वांनी भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन मंदिराची पाहणी केली. व यावेळी उपस्थित मंडळींशी संवाद साधला
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक विश्वास मुरकुटे व सचिन भाऊ जगताप यांच्यामध्ये अनेक विषयावर चर्चा झाल्या. यावेळी मार्केट कमिटीचे संचालक मा.बाबासाहेब जगताप जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगर मा.अभिजीत खोसे, बनपिंपरी गावचे लोकनियुक्त सरपंच मा. गौतम पठारे, गंगाधर जगताप, राजू जगताप व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.