EVM – Nagari Punch https://nagaripunch.com Wed, 08 May 2024 09:11:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://nagaripunch.com/wp-content/uploads/2024/10/wp-1727982521960-150x150.png EVM – Nagari Punch https://nagaripunch.com 32 32 बापरे… पाथर्डीचा जवान करतोय EVM हॅक https://nagaripunch.com/bapre-pathardi-jawan-is-doing-evm-hack/ https://nagaripunch.com/bapre-pathardi-jawan-is-doing-evm-hack/#respond Wed, 08 May 2024 09:11:44 +0000 https://nagaripunch.com/?p=5541 अडीच कोटींच्या बदल्यात करणार होता फेरफार, संभाजीनगरमध्ये झाली अटक

अहिल्यानगर, ता. 8 : लोकसभा निवडणुकीदरम्यान ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी लष्कराच्या एका जवानाने ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील या प्रकरणी पोलिसांनी लष्कराच्या एका जवानाला अटक केली आहे. हा जवान अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील रहिवाशी असून मारुती ढाकणे असे त्याचे नाव आहे. सध्या तो जम्मू काश्मिरमधील उधमपूर येथे पोस्टींगवर आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. ईव्हिएम मशिनमध्ये फेरफार करुन एका विशिष्ट उमेदवाराला अधिक मते पाडल्याचा दावाही या जवानाने केला होता. त्यामुळे तो उमेदवार कोण, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

 

मारुती ढाकणे (वय 42) हा पाथर्डी येथील रहिवासी आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये चिपच्या माध्यमातून फेरफार करण्यासाठी त्याने राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. दानवे यांनी आरोपींविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार केली. त्यानुसार सापळा लावण्यात आला. काल मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास आरोपींनी दानवे यांचे लहान भाऊ राजेंद्र दानवे यांची संभाजीनगरमधील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये भेट घेतली. वाटाघाटीनंतर अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे 2.5 ऐवजी 1.5 कोटी रुपयांत हा सौदा ठरला होता. राजेंद्र दानवे यांच्याकडून टोकन मनी म्हणून एक लाख रुपये घेत असताना पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडले. याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

 

 

 

प्रचंड कर्जामुळे रचला कट

 

पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितले की, आरोपींवर मोठे कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी ही युक्ती अवलंबली होती. त्याला मशीन (EVM) बद्दल काहीच माहिती नाही. आम्ही त्याला अटक केली असून, येथील क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक) आणि 511 (गुन्हा करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

]]>
https://nagaripunch.com/bapre-pathardi-jawan-is-doing-evm-hack/feed/ 0