ताज्या बातम्यातूकाई उपसा सिंचन योजना लवकरच पूर्णत्वास :आ.राम शिंदे

तूकाई उपसा सिंचन योजना लवकरच पूर्णत्वास :आ.राम शिंदे

spot_img
spot_img

आ.शिंदे यांनी अधिवेशनात ‘तूकाई’योजने संदर्भात उपस्थित केला प्रश्न…

कर्जत दि.12 डिसेंबर 2023

तुकाई उपसा सिंचन योजने संदर्भात आज दि. १२/१२/२०२३ रोजी हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली . आमदार प्रा राम शिंदे साहेब यांनी विचारलेल्या प्रश्नावर जलसंधारण मंत्र्याचे सविस्तर उत्तर

आमदार प्रा . राम शिंदे साहेब यांनी कर्जत तालुक्यातील आवर्षण प्रवण भागाला पाणी मिळण्यासाठी भाजप सरकार मध्ये ते स्वतः जलसंधारण मंत्री असताना जलसंधारण विभागामार्फत सर्वात मोठी पथदर्शी पाणी उपसा योजना म्हणून या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मंजूरी देऊन अवर्षण प्रवण भागातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले होते .

महाविकास आघाडी सरकारच्या काळात या संदर्भात कोणतीही हालचाल झाली नाही किंबहुना कर्जतचे विद्यमान लोक प्रतिनिधी हे याबाबत उदासीन होते . _वनविभागाची परवानगी नाही?, विहिरीसाठी जागा ताब्यात घेण्यासाठी विलंब, शेतकरी विरोध अशा_ सबबीखाली हि योजना हेतुपुरस्पर रखडविणेत आली . त्यानंतर आमदार श्री राम शिदे हे विधान परिषद सदस्य झाले आणि त्याच वेळी राज्यात सत्ता बदल होत महायुतीचे सरकार आले.

पुन्हा या योजनेला गती देण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे साहेबांनी पाठपुरावा सुरु केला . जलसंधारण मंत्र्याच्या दालनात बैठक लावण्यात आली . हेतुपुरस्पर हि योजना रखडविली म्हणून संबंधितावर जबाबदारी निश्चित करत कारवाईचे संकेत हि या बैठकीत जलसंधारन मंत्र्यांनी दिले होते . आणि मार्च २०२४ पर्यत हि योजना पूर्णत्वास नेऊन लोकार्पण करण्याचे अधिकारी, लोक प्रतिनिधी बैठकीत ठरले होते . त्या अनुषंगाने आज या योजने संदर्भात हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चर्चेसाठी हा विषय मांडण्यात आला.

आमदार प्रा राम शिंदे साहेब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री महोदयानी सांगितले कि या योजनेच्या कामासाठी चिंचोली फाटा येथे १७ गावातील नागरिकांनी आंदोलन केले होते . तसेच वन्यजीव परवानगी जानेवारी २०२३ मध्ये मिळाल्याने वितरण प्रणालीचे काम सुर करणेत आले आहे तसेच पंप हाउसच्या कामासाठी आवश्यक असणारी जमिन भूसंपादन २०१३ च्या कायद्यान्वये पुन्हा नवीन प्रस्ताव तयार करून स्थानिक लाभधारक शेतकऱ्याची जमीन दि२७/१०/२०२३ रोजी ताब्यात घेतल्या नंतर प्रत्यक्ष खोदकाम सुरु करणेत आले आहे . तसेच तुकाई उपसा सिंचन योजना शिंदे शिवार ता कर्जत या योजनेच्या विजेसाठी चे स्विच यार्ड व १३२/३३ के.व्ही साठीचे कामांसाठी लागणार अंदाज पत्रक करण्याची कार्यवाही प्रगती पथावर आहे . अशी माहिती जलसंधारण मंत्री श्री संजय जी राठोड यांनी सभागृहाला दिली.

तुकाई उपसा सिंचन योजनेसाठी तत्कालीन जलसंधारण मंत्री आमदार प्रा . राम शिंदे साहेब यांनी सर्वस्व पणाला लावत या अवर्षणप्रवण भागासाठी वरदान ठरणारी योजना जलसंधारण विभागातून मंजूर करून घेतली होती . जलसंधारण विभागाची तुकाई उपसा सिंचन योजना राज्यासाठी पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे असे मत भाजपा तालुकाध्यक्ष श्री शेखर खरमरे यांनी .प्रसिद्धी माध्यामात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे . ..

लेटेस्ट न्यूज़