ताज्या बातम्याआढळगाव प्रकरणातील अटकेतील चार आरोपींसह फरार उबाळेचाही जामीन फेटाळला

आढळगाव प्रकरणातील अटकेतील चार आरोपींसह फरार उबाळेचाही जामीन फेटाळला

spot_img
spot_img

आढळगांव येथील ग्रामपंचायत सदस्यास रिव्हॉल्वरचा धाक प्रकरणातील अटकेतील चार आरोपींसह फरार असलेल्या ज्ञानेश्वर उर्फ माऊली उबाळेचाही जामीन फेटाळला.

श्रीगोंदा प्रतिनिधी दि.३१ ऑगस्ट २०२४

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ग्रामपंचायत अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी  सदस्याचे अपहरण केल्याचा गुन्हा सरपंच शिवप्रसाद उबाळे याच्यासह आठ अज्ञात व्यक्तीं विरोधात मिरजगाव ता. कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी अटकेतील आरोपी किशोर सांगळे, सनी पवार, महेंद्र गोडसे, सागर मुंडे या चार आरोपींसह फरार असलेला आरोपी ज्ञानेश्वर उबाळे याचा अटकपूर्व जामीन शुक्रवार दि.२९ रोजी श्रीगोंदा जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सरपंच शिवप्रसाद उबाळे याचा भाऊ ज्ञानेश्वर उबाळे ग्रामपंचायत सदस्य अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की दि. ९ जुलै रोजी आढळगाव येथील फिर्यादी दिपक दादाराम राऊत हे माहिजळगांव बायपास ता. कर्जत येथे पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबलेले असताना आरोपी सरपंच शिवप्रसाद उबाळे आणि त्याच्या इतर आठ साथीदारांनी दीपक दादाराम राऊत  यांच्या गाडीसमोर वेरना व त्यामागे क्रेटा गाड्या उभ्या केल्या व क्रेटा गाडीमधील अनोळखी इसमांनी फिर्यादीस रिव्हॉल्वरचा धाक दाखवुन आढळगांव ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदावरील अविश्वास ठराव मंजुर होऊ नये या उद्देशाने फिर्यादी यांच्या गाडीतील ग्रामपंचायत सदस्य नितीन बन्सी गव्हाणे यांना शिवीगाळ, मारहाण केली व गाडीत बसवुन अपहरण करुन घेवुन गेले बाबत मिरजगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिनेश आहेर यांनी  रेकॉर्डवरील आरोपी  किशोर सोमनाथ सांगळे, सागर देव मुंडे, प्रतिक ऊर्फ सनि राजेंद्र पवार, महेंद्र ऊर्फ गोट्या अरुण गोडसे यांना अटक केली होती. त्यांच्यासह आरोपींचे साथीदार  अमोल भोसले,  माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर उबाळे रा. आढळगांव हा फरार असून त्याचाही अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांनी फेटाळून लावला आहे.

फिर्यादीच्या वतीने ॲड. सुमित पाटील, सरकारी वकील ॲड. केदार केसकर तर आरोपीच्या वतीने ॲड. महेश तवले व ॲड. अनिकेत भोसले यांनी कामकाज पाहिले.

लेटेस्ट न्यूज़