कर्जत जामखेडचे विकासपुत्र रोहित पवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार
कर्जत जामखेड .दि.27 ऑक्टोबर 2024
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि जनसामान्यांचा आवाज बनलेले आमदार रोहित पवार हे सोमवारी (दि. 28 ऑक्टोबर ) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार रोहित पवार यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक क्षणी शिरुर लोकसभेचे लोकप्रिय संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गेल्या पाच वर्षात रोहित पवार यांनी मतदारसंघात लोकाभिमुख, प्रगतिशील आणि दूरदृष्टीपूर्ण विकासकामे केली आहेत. शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा अशा महत्त्वाच्या क्षेत्रात सुधारणा करून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांनी पाच वर्षात दिलेले शब्द पुर्ण केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रामाणिक, ध्येयवेडे आणि स्वाभिमानी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. जनसामान्यांसाठी झगडणारा, स्वाभिमानाने लोकांसाठी लढणारा असा त्यांचा लौकिक आहे. मतदारसंघाच्या कायापालट करण्याच्या ध्येयाने विकासाचे व्हिजन ठेवत त्यांनी आपल्या कामातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. जनतेचा अपार विश्वास आणि विकासाची दूरदृष्टी असलेल्या रोहित पवार यांच्याकडे उद्याचं राज्याचे नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. विकासाचे ध्येय आणि जनहिताची निष्ठा जोपासणाऱ्या या नेत्याच्या पाठिशी पुन्हा एकदा संपूर्ण कर्जत-जामखेडकर एकवटला आहे. त्यामुळे ही निवडणुक कोणी कशावरही नेण्याचा प्रयत्न केला तरी ही निवडणूक विकास विरुद्ध विकासाचे मारेकरी ह्या एकाच मुद्यावर होणार आहे आणि यामध्ये आमदार रोहित पवार यांची कित्येक पटीने सरशी होणार हे निश्चित आहे.
आमदार रोहित पवार हे उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी कर्जत येथील फाळके पेट्रोल पंपाशेजारील मैदानावर जाहीर सभेचे आय़ोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या नेत्याला पाठिंबा देण्यासाठी कर्जत जामखेड मतदारसंघातील सर्व स्वाभिमानी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कऱण्यात येत आहे.