घुटेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करत जगतापांचा प्रस्थापितांना धक्का
श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या ग्रामपंचायतीचे रणशिंग फुंकलेले आहे. त्यामुळे सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत असतानाच घुटेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करत मा. आमदार राहुलदादा जगताप पा. यांनी आपले वर्चस्व सिद्ध केलेले आहे. सर्वच नवनिर्वाचीत सदस्याचे मा.आ. राहुलदादा जगताप पा. यांनी अभिनंदन व सत्कार केला व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यामध्ये सरपंच म्हणुन गोविंद कारभारी घुटे यांची निवड झाली तर ग्रामपंचायत सदस्यपदी पुजा सतिष गव्हाणे, बापु भिवसेन घुटे, योगेश मच्छिंद्र दारकुंडे, रुपाली सुरेश घुटे, बाबासाहेब मारुति गव्हाणे, अलका राजाराम लोखंडे, सुरेखा सुनिल घुटे यांची बिनविरोध निवड झालेली आहे.
यावेळी मा. सरपंच संतोष लोखंडे, विजयशेठ लोखंडे, दत्तात्रय दारकुंडे, गजानन पवार, संदिप घुटे, अविनाश गव्हाणे, संदिप दारकुंडे, शहाजी घुटे, भाऊसाहेब अंभोरे, माउली मांगडे, रामचंद्र दारकुंडे, राजु अंभोरे आदि उपस्थित होते. मोठ्या जल्लोषात विजयी उमेदवारांचे स्वागत आनंद उत्सव साजरा करण्यात आला.