ताज्या बातम्याखादी ग्रामोद्योगच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची बिनविरोध निवड

खादी ग्रामोद्योगच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची बिनविरोध निवड

spot_img
spot_img

चेअरमन पदी गायकवाड तर व्हा.चेअरमन पदी श्रीराम

श्रीगोंदा दि.27 फेब्रुवारी 2024

श्रीगोंदा तालुका खरेदी विक्री संघाच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या चेअरमन व्हा.चेअरमन निवडीत चेअरमनपदी बापूसाहेब गायकवाड आणि व्हा चेअरमनपदी बबन श्रीराम यांची बिनविरोध निवड करत माजी आमदार राहुल जगताप यांनी संघावर आपली पकड मजबूत केली. या निवडणुकीत माजी चेअरमन अंकुश शिंदे यांच्या खेळीने राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांची स्ट्रॅटर्जी फेल ठरली.

नुकत्याच झालेल्या श्रीगोंदा तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या निवडणुकीत मा.आ.राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखालील श्री संत शेख महंमद महाराज पॅनलच्या गटाने ११ पैकी ११ जागा जिंकून आपले एकहाती वर्चस्व स्थापन करत विरोधी गटाचा ४१४ मतांनी दारुण पराभव केला होता.

काल झालेल्या चेअरमन व्हा.चेअरमन निवडीत राज्य बाजार समितीचे सभापती यांनी लक्ष घालत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र संघाचे माजी चेअरमन अंकुश शिंदे यांनी केलेल्या खेळीमुळे नाहटा यांची स्ट्रॅटर्जी फेल ठरत निवड बिनविरोध होऊन चेअरमन व्हा चेअरमन निवडीत माजी आमदार राहुल जगताप यांना संघावर आपली पकड मजबूत करण्यात यश आले.काल झालेल्या निवडणुकीत ११ पैकी १० संचालकांनी हजर राहत निवडणूक बिनविरोध करत चेअरमनपदी बापूसाहेब गायकवाड आणि व्हा चेअरमनपदी बबन श्रीराम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीसाठी माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदचे माजी सदस्य सचिन जगताप यांनी मोलाची मदत केली.

चौकट

मी मोठा नेता नक्कीच नाही मात्र समाज्याच्या नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकतो. चेअरमन व्हा चेअरमन निवडीत राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी निवडणूक प्रतिष्ठेची करत संचालकांना फोडण्यासाठी आर्थिक घोडेबाजार करत लाखोंची अमिषे दाखवत उमेदवार फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संचालकांनी कोणत्याही आमिषाला तसेच राजकीय दबावाला बळी न पडता ठाम राहत विजय खेचून आणला. यात नाहटा यांनी रचलेली खेळी अयशस्वी झाली. तोच खरा आमचा विजय झाला.

मा.चेअरमन अंकुश शिंदे  

चौकट

मोडकळीला आलेल्या खादी ग्रामोद्योग संघाला येणाऱ्या काळात उर्जित अवस्थेत आणत संघ मजबूत करणार..

    मा.आ. राहुल जगताप

लेटेस्ट न्यूज़