ताज्या बातम्याशिवजन्मोत्सव समितीचे विविध कार्यक्रम आजपासून

शिवजन्मोत्सव समितीचे विविध कार्यक्रम आजपासून

spot_img
spot_img

तालुक्यात प्रथमच अकरा फुट उंचीच्या शिव प्रतिमेचे पूजन 

श्रीगोंदा दि.18 फेब्रुवारी 2025

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती श्रीगोंदा शहरात सन २०१२ पासून शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत आहे. यंदा दोन दिवसीय भव्य शिवजयंती आयोजित करण्यात आली असून तालुक्यात प्रथमच अकरा फुट उंचीच्या शिव प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बाल कलाकार आणि मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंचे दर्शन विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून करणार आहेत. ह.भ.प. प्रदीप महाराज सोळुंखे यांचे शिवकिर्तन होणार असून सदरील कार्यक्रमास तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व सरपंच, उपसरपंच, चेअरमन आणि तमाम शिवप्रेमी उपस्थित राहणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बालु मखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सालाबादप्रमाणे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी श्रीगोंदा नगरपरिषदेच्या सांस्कृतिक भवन, पंतनगर येथे रांगोळी स्पर्धा सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत होणार असून सायंकाळी २ ते ६ दरम्यान छत्रपती बाईक रॅली व रथ यात्रा श्रीगोंदा शहरातून निघणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना मानवंदना देण्यासाठी फुले सर्कल येथे सावित्रीबाई फुले यांचे वंशज डॉ. नूतन लोणकर-नेवसे यांच्या हस्ते राष्ट्रपुरुष दिप प्रज्वलन दिपोत्सव कार्यक्रम सायं. ६:३० ते ७:०० वा.च्या दरम्यान होणार आहे.

शिवजयंतीच्या दिवशी सकाळी ६:०० ते ७:३० वाजेपर्यंत छत्रपती मॅरेथॉन स्पर्धा जोधपुर मारुती चौक येथे घेण्यात येणार आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सकाळी ९:०० वा. माजी मंत्री बबनराव पाचपुते, खा. निलेश लंके, मा.आ. राहुल जगताप, आमदार विक्रम पाचपुते, शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते, नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते घनश्याम शेलार, मा. नगराध्यक्ष मनोहर पोटे, बापू गोरे, बाळासाहेब नाहाटा, अशोक खेंडके, तहसिलदार डॉ. क्षितिजा वाघमारे, पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येईल. यावेळी श्री शनैश्वर भजनी मंडळाचा सदस्या बाल शिवाजी राजेंचा पोवाडा सादर करणार आहेत. तसेच वेशभूषा स्पर्धा व सांस्कृतिक पथक संचलन होणार आहे. स.१०:०० ते ११:०० या वेळेत पालखी मिरवणूक श्रीगोंदा शहरातून निघणार आहे. सायं. ५ वाजता लहान मुलांची भाषणे व बाल सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येईल. सायं. ८ वाजता ह.भ.प. प्रदीप महाराज सोळुंखे यांचे शिवकिर्तन होणार असून शिवकिर्तनानंतर उपस्थित नागरिकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे रांगोळी स्पर्धा, छत्रपती बाईक रॅली व रथ यात्रा, छत्रपती मॅरेथॉन स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, लहान मुलांची भाषणे व बाल सांस्कृतिक कार्यक्रम या सर्व स्पर्धांसाठी नावनोंदणी करावी. रविवार दि. २३ फेब्रुवारी रोजी श्री संत शेख महंमद महाराज मंदिर येथे स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार असून मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार आहे. सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील राजकीय, सामाजिक संघटना व तरुण मंडळे यांसह विद्यार्थी व नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा व शिवजयंतीसह सर्व सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बालू मखरे, उपाध्यक्ष चांदणी खेतमाळीस, कार्याध्यक्ष मीरा शिंदे, खजिनदार राजश्री शिंदे, सचिव मीरा खेंडके, ज्योती खेडकर, मार्गदर्शक अरविंद कापसे, राजेंद्र राऊत, शाम जरे, अजिजभाई शेख, गोरख घोडके, परिश जाधव, दिपक मखरे यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज़