ताज्या बातम्याविजय आपलाच पण् कोणालाही कमी लेखत गाफील राहू नका :आ. आशुतोष काळे

विजय आपलाच पण् कोणालाही कमी लेखत गाफील राहू नका :आ. आशुतोष काळे

spot_img
spot_img

शक्ती प्रदर्शनासह अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत काळेंचा उमेदवारी अर्ज दाखल

कोपरगाव दि.26 ऑक्टोबर 2024

आमदार आशुतोष काळे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनासह शुक्रवारी (दि. २५) कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वासही आमदार काळे यांनी यावेळी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीसाठी आमदार आशुतोष काळे यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पहिल्याच यादीत जाहीर झाले. शुक्रवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक व अभिनेते सयाजी शिंदे, माजी आमदार अशोकराव काळे, चैताली काळे, राजेश परजणे, काका कोयटे, राजेंद्र जाधव, अशोकराव रोहमारे, विजय वहाडणे, पद्माकांत कुदळे, कारभारी आगवण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, महायुतीच्या घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. अहिंसा स्तंभापासून ते तहसील कार्यालयापर्यंत कार्यकर्त्यांनी आमदार काळे व अभिनेते सयाजी शिंदे यांना खांद्यावर घेतले.

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार काळे म्हणाले की, निवडणुकीत विरोधी पक्ष असणारच आहे. त्याबाबत माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार असले तरी निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे. गेल्या पाच वर्षात विकासकामे पूर्ण केली आहेत. मतदारसंघातील नागरिक समाधानी आहेत. निवडणूक ही निवडणुकीप्रमाणेच होईल, त्याप्रमाणे कुणालाही कमी न लेखता कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. जास्तीत जास्त मतदान घडवून आणत मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.

नावातच आशीर्वाद आणि आनंद- : सयाजी शिंदे

आमदार आशुतोष काळे यांनी पाच वर्षात मोठी विकासकामे केली आहेत. त्यांच्यावर जनतेचे किती प्रेम आहे, हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेल्या गर्दीवरून दिसून येत आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ही माझी पहिलीच सभा; पण ही सभा नसून विजय रॅली आहे. लवकरच गुलाल उधळू या. त्यांच्या कामाची पद्धत अतिशय चांगली आहे. जनतेचा त्यांना आशीर्वाद आहे. – येणाऱ्या निवडणुकीत आमदार आशुतोष काळेंचा विजय निश्चित असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज़