लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गावकऱ्यांचा निर्णय
कर्जत :दि .29 मार्च 2024
निमगाव डाकू (ता.कर्जत) गावास आणि परिसरातील वाड्या-वस्त्यावर हक्काचे कुकडीचे पाणी आवर्तन न मिळाल्यास आगामी लोकसभा निवडणुकीसह विधानसभा आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदानावर बहिष्काराचा निर्णय एकमुखाने गुरुवारी ग्रामस्थांनी घेतला.
यावेळी खासदार, व दोन्ही आमदार आणि पालकमंत्र्यांचा निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. जर आज आवर्तन निमगाव डाकूस न दिल्यास तालुक्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांना देखील गावबंदी करण्यात येईल असे देखील ग्रामस्थांनी बजावले.
यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.