पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाटलांच्या घरी दिली अचानक भेट
वांबोरी दि 15 जानेवारी 2024
आधुनिक मुक्त गोठा पद्धतीनेही जनावरे निरोगी राहतात, तसेच चार्याचे नियोजन केल्यास दुग्धव्यवसायाचा खर्च कमी होऊन उत्पन्नवाढीस फायदा होईल, अशा शब्दांत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुग्धव्यावसायिकांना मार्गदर्शन केले.
महसूलसोबतच दुग्धविकास मंत्रीही असलेल्या विखे पाटील यांनी आज (शनिवारी) वांबोरी येथे आप्तेष्ट अॅड. सुभाष पाटील यांच्या घरी अचानक भेट दिली. त्या वेळी त्यांच्या मुक्त गोठ्याची पाहणी करून जमलेल्या पशिपालकांशी चर्चा केली.
दुधावरील पाच रुपये प्रतिलिटर अनुदानाविषयी शेतकर्यांच्या प्रतिक्रिया त्यांनी जाणून घेतल्या. वांबोरीचे सरपंच किरण ससाणे यांनी गावच्या वतीने विखे यांचा सन्मान केला. ग्रामपंचायत सदस्य सारंगधर पटारे, रवीभाऊ काळे, विलास गुंजाळ, रविकिरण पटारे, भरतशेठ वर्मा, मनोज बिहानी बाबासाहेब गाडे, एकनाथ गवते, हारुणभाई दारूवाले, भास्कर मोरे, सोमनाथ माळवदे, शिवाजी जंगम आदी उपस्थित होते.