ताज्या बातम्याविठ्ठलराव वाडगे खऱ्या अर्थाने सहकार महर्षी : डॉ.सागर आटोळे

विठ्ठलराव वाडगे खऱ्या अर्थाने सहकार महर्षी : डॉ.सागर आटोळे

spot_img
spot_img

वृद्धेश्वर मल्टीस्टेटच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त महिला बचत गटांना कर्ज वाटप

श्रीगोंदा दि.7 मे 2025

१२ वर्षापूर्वी संस्थापक चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांनी वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे रोपटे लावले गेल्या १२ वर्षात २८५ कोटी रुपयांच्या ठेवी मिळवणे,महिला बचत गटातील महिलांना २२ कोटींचे कर्ज वाटप करणे ,शेतकऱ्यांना बियाणापासून कृषी मालाला अधिक दर मिळण्यासाठी चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती उभारणे हि सर्व कामे करणारे विठ्ठलराव वाडगे हे खऱ्या अर्थाने सहकार महर्षी असल्याचे गौरवोद्गार ज्ञानसागर गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सागर आटोळे यांनी श्रीगोंदा येथे बोलताना काढले.

वृध्देश्वर अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी श्रीगोंदा च्या १२ व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित महिला मेळावा आणि विद्यार्थी करियर कार्यक्रमात अध्यक्षपदावरून आटोळे बोलत होते.

ते पुढे म्हणाले सामाजिक बांधिलकी आणि सामान्य लोकांच्या उन्नतीचा उदात्त हेतू असला की हे घडते यासाठी चिकाटी,हेतू शुद्ध असावा लागतो या यशामध्ये ग्राहक,सभासद,कर्मचारी यांचाही वाटा असल्याचे वाडगे यांनी कर्मचाऱ्यांचा सन्मान करून दाखवले.आता कर्ज घेतलेल्या महिलांनी उद्योग छोटा का असेना पण त्यात पैसे गुंतवून स्वतःचा आर्थिक उत्कर्ष करावा तसेच वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटीचा देखील लौकिक वाढवावा असे आवाहन करून भविष्यात आपण देखील वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी साठी ठेवी देऊ असे ते म्हणाले.

प्रसिद्ध व्याख्यात्या विजया वामन यांनी महिलाना मार्गदर्शन करताना महिलांनी संसार गाडा चालवताना स्वतःच्या उत्कर्षाचा विसर पडू देऊ नये विठ्ठलराव वाडगे सारखी माणसे महिला सक्षमीकरण साठी झटत आहेत त्यांना प्रतिसाद देऊन आपण यशस्वी होऊ याची खुणगाठ बांधून संसाराला आर्थिक मदत होण्यासाठी कष्ट करा,आपल्या लेकी, सुना यांना प्रोत्साहन द्या असे आवाहन करून वाडगे यांची पत्नी सौ.रुक्मिणी ताई वाडगे,स्नुषा सौ.सायली वाडगे ,मुलगी सौ.मेघना गावडे या देखील महिला सक्षमीकरण मध्ये नवनविन योजना महिलांसाठी राबवत आहेत याचे कौतुक केले.

कृषी उद्योजक पवन थोरात यांनी कृषी बाबत वाडगे यांनी राबविलेले उपक्रम जिल्ह्यात आदर्श ठरत असून ऑनलाईन कृषी मार्गदर्शन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

वृध्देश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी चेअरमन सौ.सायली वाडगे यांनी बोलताना १२ वर्षाच्या वाटचाली मध्ये बचत गटातील महिलांनी वेळेवर कर्ज परत केल्याने वर्धापन दिना निमित्त प्रति महिला १लाख रुपये तसेच,प्रति महिला ९०हजार रुपये,प्रति महिला ७० हजार रुपये असे २२ लाखाचे कर्ज वाटप केल्याचे सांगितले.

यावेळी,देवी महिला बचत गट औटेवाडी ३ लाख रुपये,राधाकृष्ण महिला बचत गट, मढेवडगाव २लाख ४० हजार,दत्त महिला बचत गट घारगाव २लाख १० हजार रुपये कर्ज वाटप विजया वामन,सागर आटोळे ,आदींच्या हस्ते देण्यात आले.

व्यवस्थापक प्रदीप आठरे यांनी कर्मचारी वृंद तर्फे मनोगत व्यक्त करताना शिक्षक होण्याचे स्वप्न धूसर होताना विठ्ठलराव वाडगे यांनी नोकरीची संधी दिली सुमारे १०० कर्मचारी सेवेत असून प्रत्येकाच्या अडचणीत वाडगे कुटुंब उभे राहत असून मालक सेवक नाते नसून परिवार समजत असल्याने सोसायटी प्रगती करत आहे.

लेटेस्ट न्यूज़