Friday, December 20, 2024

पोद्दार लर्न स्कूल कडून “मतदान जनजागृती”पथनाट्य सादर

मतदान जनजागृती’ पथनाट्यास श्रीगोंदेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीगोंदा दि.16 नोव्हेंबर 2024

भारतीय लोकशाहीचा अभिमान चला करू मतदान या वृद्धांत संकल्पनेवर आधारीत पथनाट्य व्येंकटेश पोदार लर्न स्कूल,श्रीगोंदा या शाळेतील इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केले.

या पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व आणि जबाबदारी यावर प्रकाश टाकला.  हे पथनाट्य श्रीगोंद्यातील शनी चौक, बगाडे कॉर्नर, व क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक या ठिकाणी सादर करण्यात आले. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचा उपयोग कसा महत्त्वाचा आहे हे विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रसंगांद्वारे प्रेक्षकांसमोर मांडले.

या उपक्रमासाठी शाळेचे विद्यमान प्रिन्सिपल श्री. जितेंद्र वाघमारे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.श्री.प्रकाश शिवाजी धोत्रे सर यांनी पथनाट्याचे दिग्दर्शन केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रतिभा प्रकाश मोरे मॅम यांनी केले.

पथनाट्याची सुरूवात ढोल ताशे वाजवून श्री. प्रितम दुतारे सर यांनी केली.संस्थेचे चेअरमन श्री.नवनीत मनसुखलाल मुनोत सर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणली.सौ.सेजल गौरव मुनोत मॅडम यांनी तहसीलदार डॉ.सौ.क्षितिजा वाघमारे मॅडम यांचा सत्कार केला. सौ.लेखा मुथा मॅडम यांनी पत्रकार सौ. गायत्री ढवळे मॅडम यांचा सत्कार केला.केंद्र प्रमुख श्री.मानिक आढाव सर यांचा सत्कार श्री. नवनीत मुनोत सरांनी केला पत्रकार श्री.गणेश कविटकर यांचा सत्कार श्री.राहूल कोठारी सर यांनी केला. पत्रकार श्री सुहास कुलकर्णी यांचा सत्कार श्री. अनुप बगाडे सरांनी केला. पत्रकार श्री.पीटर रणसिंग सर यांचा सत्कार श्री.गौरव मुनोत यांनी केला.

स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या पथनाटयाला मिळाला.

श्रीगोंदा तालुक्याच्या तहसीलदार डाॅ. सौ.क्षितिजा वाघमारे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मनापासून कौतुक केले.शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी‌ यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी आपल्या पथनाट्य सादरीकरणातून प्रेक्षकांच्या मनात लोकशाही आणि मतदाना विषयी नवी चेतना निर्माण केली.

श्रीगोंदा परिसरातील व्येंकटेश पोदार लर्न स्कूल,श्रीगोंदा.या शाळेमध्ये असलेल्या या प्रकारच्या सामाजिक जाणिवेच्या उपक्रमांचे नागरिकांनीही कौतुक केले. “शालेय विद्यार्थ्यांनी मतदानासाठी घेतलेला हा पुढाकार आशादायक आहे.” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.शाळेतील या सामाजिक जाणिवेच्या उपक्रमामुळे श्रीगोंदा शहरात लोकशाही आणि मतदानाबाबत नवचेतना निर्माण झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या