वडाळी-सुरोडी गावच्या सरपंचांनी दिले आगर प्रमुखांना निवेदन
श्रीगोंदा दि.31 ऑक्टोबर 2023
वडाळी -सुरोडी गावातील विध्यार्थीची शाळेत जाण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेता. विद्यार्थ्यांची शाळेची वेळ व बसची वेळ यात तफावत असल्याने विध्यार्थ्याचे अतिशय हाल होत आहेत.ही बाब लक्षात घेऊन संरपंच दरेकर व सकट यांनी आगार प्रमुख प्रशांत होले यांची भेट घेऊन सद्यस्थिती त्यांच्या निदर्शनास आणुन दिली व वेळ बदलण्यासाठी निवेदन देऊन मागणी केली.
यावेळी उपस्थित वडाळी गावचे सरपंच महेश दरेकर, सुरोडी गावचे सरपंच मीनाताई सकट, केशव जाधव, उत्तम वागसकर, दत्तात्रय शेळके, रमेश शिर्के आदी उपस्थित होते.