ताज्या बातम्याकोविड सेंटरच्या पैशांमधून बंगले बांधले त्याचे काय ? खासदार डॉ. सुजय विखे...

कोविड सेंटरच्या पैशांमधून बंगले बांधले त्याचे काय ? खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा रोख कुणाकडे

spot_img
spot_img

संजय राऊत यांच्या टीकेला खासदार सुजय विखे यांचे जोरदार प्रत्युत्तर

नगर दि.24 फेब्रुवारी 2024

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. आगामी निवडणुकांच्या प्रचारासाठी आता राजकीय पक्ष आणि नेते सज्ज होत आहेत.

राजकीय पक्षांकडून आपल्या कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी विजयाचे मंत्र सांगितले जात आहेत.निवडणुकीत कशी प्लॅनिंग करायची हे आत्तापासूनच ठरवले जाऊ लागले आहे.

दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय पक्ष अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी जनतेला कसे सामोरे गेले पाहिजे याविषयी मोठे भाष्य केले आहे.

नड्डा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तसेच नेत्यांना निवडणूक काळात महागडे घड्याळ, पेहराव करू नका असा सल्ला दिला आहे. मात्र यावर विपक्ष मधील नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे.

महाविकास आघाडी मधील उबाठा शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील जे. पी. नड्डा यांच्या या सल्ल्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राऊत यांनी भाजपाचे कार्यकर्ते आणि नेते वापरत असलेली महागडी घड्याळे, वाहने, पेहराव यांच्यावर हल्ला चढवला आहे.

एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाखो रुपयांच्या ड्रेसवरून देखील जोरदार टीका केली आहे. दरम्यान याच टीकेला उत्तर देताना अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिणचे खासदार तथा भाजपाचे नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर आणि त्यांच्या पक्षांच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी संजय राऊत यांच्या या टीकेला उत्तर देताना म्हटले की,

“यांचे नेते कोट्यवधीच्या गाडीमध्ये फिरतात. हेलिकॉप्टरमध्ये फिरत असताना तो पैसा कुठून येतो हेदेखील पाहिले पाहिजे. भाजपचे पक्षाध्यक्ष नड्डा यांनी सुचवलेल्या जीवनशैलीचा वेगळा अर्थ कोणी काढू नये.

हे राऊतांना समजणार नाही. ते त्यांना समजण्याच्या पलीकडचे आहे”. पुढे बोलताना सुजय विखे पाटील यांनी, ‘यांच्या नेत्यांनी कमाईचे कोणतेही साधन नसताना कोविड सेंटरच्या पैशातून गाड्या आणि बंगले घेतले आहेत.

त्यांच्या त्या पक्षाच्या नेत्याच्या टीकेला काय उत्तर द्यायचे ? आणि त्यांनी अशी टीका करणेदेखील योग्य वाटत नाही’ असे यावेळी म्हटले आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.यामुळे येत्या काही दिवसात जेव्हा निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू होईल तेव्हा राजकीय नेते एकमेकांवर काय आरोप लावतील हे सांगता येत नाही.

 

लेटेस्ट न्यूज़