अहमदनगर बातम्याजायकवाडीला पाणी सुटण्यापूर्वी आ.गडाखांनीं आंदोलन का केले नाही :मा.आ.मुरकुटे

जायकवाडीला पाणी सुटण्यापूर्वी आ.गडाखांनीं आंदोलन का केले नाही :मा.आ.मुरकुटे

spot_img
spot_img

उद्या होणारा रास्ता रोको म्हणजे राजकीय फार्स :मा.आ. मुरकुटे 

नेवासा दि.1 नोव्हेंबर 2023

 

समन्यायी पाणी वाटप कायदा 2005 करणारेच आज पाणी सोडण्याची विरोधात आंदोलन करीत आहेत. हा कायदा होत होता त्याच वेळेस जर विरोध केला असता तर आज आंदोलन करण्याची गरज पडली नसती, कायदा करणारेच आज रस्त्यावर बसण्याची भाषा बोलत आहे हा प्रकार म्हणजे ‘वराती मागून घोडे’असल्यासारखा आहे उद्या घोडेगाव मध्ये होणारी रस्ता रोको आंदोलन म्हणजे राजकीय फार्स आहे 2024 जवळ येत असल्याने राजकीय स्वार्थासाठी चाललेला हा प्रकार असल्याचा आरोप तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी शंकरराव गडाख यांच्यावर केला आहे . 2005 समन्यायी पाणी वाटप कायदा मंजूर होत होता .(त्यावेळी आमदार यशवंतराव गडाख होते. काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते .) तेव्हा गडाख झोपा घेत होते का कायदे तुम्हीच करायचे आणि त्या कायद्याचे विरोधात पुन्हा रस्त्यावरही तुम्हीच उतरायचे म्हणजे हा प्रकार शोले पिक्चर मधले छापा काट्यासारखा आहे उद्याचा रस्ता रोको हा एक राजकीय स्टंट असून शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार आहे . गेल्या चार वर्षात शेतकरी अनुदान मदत यापासून वंचित ठेवण्याचे पाप गडाख यांनी केले आहे . पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर गडाखाना जाग आली आणि आता रस्ता रोको करण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहे पाणी सोडण्याचा आदेश होत होता .तेव्हा कुठे होते गडाख प्रत्येक वेळी निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या नावावर भुलभुलय्या करून असल्या आंदोलने करून स्वतःला अटक करून घेऊन सहानुभूती लाटण्याची जुने फंडे आहेत गडाख एक नाटक कंपनी आहे पात्र तेच फक्त नावात बदल होतो समन्यायी पाणी वाटप कायदा होत असतानाही सत्तेत तुम्हीच होता आजही जायकवाडीला पाणी जाणार असताना पाणी सोडण्यापूर्वी आपण काय केले
सत्तेत तुम्हीच आहात तालुक्यातील रस्त्यावर आंदोलनाला बसण्यापेक्षा गडाख यांनी विधान भवना समोर आंदोलनाला बसावे पाणी प्रश्न हा तालुक्यासाठी जिव्हाळ्याचा विषय असल्याने गडाख यांनी याच्यात राजकारण करू नये. त्यांचे खोटे मनसुबे जनता ओळखून आहे त्यांनी शेतकऱ्यांबद्दल खोटा कळवळा असल्याचा आव आणू नये असा आरोप माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी शंकरराव गडाख यांच्यावर केला .

लेटेस्ट न्यूज़