Thursday, December 19, 2024

रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा युवा चेहरा..?

रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा युवा चेहरा…

कर्जत दि.8 ऑगस्ट 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष अजित पवार यांचे अहमदनगरमधील कर्जत- जामखेडवर विशेष प्रेम आणि लक्ष राहिले आहे. याच तालुक्यातून त्यांनी संध्या सोनवणे यांना पक्षात मोठी संधी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी संध्या सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांना ही युवती पुढे आव्हान देईल आणि राज्यात युवतींचे चेहरा ठरतील, यातून ही निवड करण्यात आल्याचे दिसते. संध्या सोनवणे या संधीचे कितपत सोनं करतात, याची देखील उत्सुकता आहे.

अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची जोरदार बांधणी केली आहे. जन सन्मान रॅली काढली आहे. पक्षाची बांधणी करताना युवक आणि तरुण चेहऱ्यांना संधी देत आहेत. यातून जामखेड (जि. अहमदनगर) तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या संध्या सोनवणे यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी संधी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईत त्यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते त्यांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या पदाच्या माध्यमातून युवतींना राजकारणात सक्रिय करणे आणि त्यांच्यात धाडस निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया संध्या सोनवणे यांनी निवडीनंतर दिली.

 

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रोहित पवार यांचे वर्चस्व आहे. भाजपला पराभूत करत त्यांनी पहिल्या पंचवार्षिकच्या टर्ममध्ये एकहाती तंबू संभाळत आहेत. राष्ट्रवादी फुटीअगोदर अजित पवार यांनी रोहित पवार यांना निवडून आणण्यासाठी बरीच मेहनत घेतली होती. पक्षफुटीनंतर रोहित पवार यांनी आजोबा शरद पवार (Sharad Pawar)

यांच्याबरोबर उभे राहिले. यानंतर मात्र अजित पवार आणि रोहित पवार यांचा सामना राज्यात रंगलेला दिसतो. तसं पाहिल्यास अजित पवारांचे कर्जत-जामखेडवर विशेष प्रेम आणि लक्ष राहिले आहे. त्यामुळे तिथे योग्य चेहऱ्याच्या संधीत अजित पवार होते. संध्या सोनवणे यांची प्रदेश पातळीवर केलेली ही निवड आगामी काळात राजकीय अर्थाने आव्हानात्मक असू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे

कामाच्या जोरावर संधी

जामखेड तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य असलेल्या सोनवणे या वकील आहेत. एका सामान्य कुटुंबातील असलेल्या संध्या सोनवणे याआधी 2018 मध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या जनरल सेक्रटरी म्हणून काम केले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अनेक वेळा यशस्वी आंदोलने केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती संघटनेची स्थापना केल्यापासून सोनवणे संघटनेत सक्रिय होत्या. त्यानंतर 2018 साली संध्या सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्याच्या सामाजिक कार्याची दाखल घेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली होती.

 

शरद पवारांची साथ सोडली

 

यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2022 मध्ये सोनवणे यांची राष्ट्रवादी विधार्थी पुणे विभागीय अध्यक्ष म्हणून निवड केली, राष्ट्रवादी फुटीनंतर जामखेड तालुक्यातून सर्वात प्रथम संध्या सोनवणे यांनी शरद पवार गटाची सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश करून चर्चेचा विषय बनल्या. अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतरही त्यांनी पक्षांचे एकनिष्ठ होत, काम सुरू ठेवले. त्याची दाखल थेट अजित पवार यांनी युवतीप्रदेशाध्यक्षपदी संध्या सोनवणे यांना संधी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या